मायकल जॅक्सनला वाटत होती कोरोनासारख्या विषाणूची भीती

Last Updated: Mar 26 2020 9:00PM
Responsive image


नवी दिल्‍ली :

दिवंगत पॉपसम—ाट मायकल जॅक्सनला कोरोना व्हायरससारख्या महामारी फैलावणार्‍या विषाणूची सतत भीती वाटत असे. त्यामुळे तो नेहमी तोंडावर मास्क बांधून वावरत होता, असे त्याचा बॉडीगार्ड मॅट फिंडस् याने एका मुलाखतीत म्हटले आहे. तो त्यावेळी जी भीती व्यक्‍त करीत असे, ती जणू काही त्याचे भाकित असल्यासारखे आज घडत असताना दिसत आहे, असेही त्याने म्हटले आहे.

मॅटने अनेक वर्षे मायकलबरोबर काम केले होते. त्याने या मुलाखतीत सांगितले, मायकलला नेहमी वाटत असे, की विषाणूजन्य महामारीचा संसर्ग संपूर्ण जगभर फैलावण्याचा धोका आहे. हे नैसर्गिक संकट नेहमीच आपल्यामध्ये उपस्थित आहे. या महामारीने कधीही आपण संपून जाऊ शकतो. अशा सूक्ष्म जीवांचे संक्रमण एकाच दिवसात चार देशांमध्ये फैलावू शकते. मायकल नेहमीच मास्क घालत असल्याने मी कधी कधी त्याची चेष्टामस्करीही करीत असे, तरीही तो आपल्या भूमिकेवर ठाम असायचा. तो म्हणत असे, की मी स्वतःला आजारी पाडून घेऊ शकत नाही. मला अनेक कॉन्सर्ट करायचे आहेत. मी पृथ्वीवर एका खास कारणासाठीच आहे आणि मला माझा आवाजही खराब करून घ्यायचा नाही. संक्रमणाने फैलावणारे आजार कुणामुळे ‘पास ऑन’ होतील हे सांगता येत नाही.