71 व्या वर्षी सागरी मार्गाने 320 दिवसांत विश्‍वभ्रमंती

Published On: Sep 12 2019 1:45AM | Last Updated: Sep 11 2019 8:32PM
Responsive image
file photo


लंडन :

ब्रिटनच्या 71 वर्षांच्या जेन सोक्रेटस् यांनी समुद्रमार्गे विश्‍वभ—मंती करण्याचा नवा विक्रम केला आहे. हा ‘नॉन-स्टॉप’ जलप्रवास त्यांनी एकटीनेच केला हे विशेष! अवघ्या 320 दिवसांमध्ये त्यांनी 38 फूट लांबीच्या नेरीडा नौकेतून हा प्रवास केला.

हॅम्पशायरच्या लिमिंग्टन येथील जेन यांनी रविवारी कॅनडामध्ये आपला हा प्रवास पूर्ण केला. त्यांनी यापूर्वी 2013 मध्येही जगाचा प्रवास केला होता. जेन यांनी 1997 मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यावर पतीबरोबर नौकेतून प्रवास करणे सुरू केले होते. त्यावेळी त्यांनी युरोप, कॅरेबियन बेटं आणि अमेरिकेचा प्रवास केला होता. 2003 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. मात्र जेन यांनी नौकानयन सोडले नाही. आताही त्यांनी एकटीने हा जगप्रवास केला आहे.