Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Vishwasanchar › करिना दुसर्‍यांदा आई होणार?

करिना दुसर्‍यांदा आई होणार?

Published On: Sep 13 2018 1:52AM | Last Updated: Sep 12 2018 11:09PMमुंबईः 

शाहिद कपूरची पत्नी मीराने नुकतेच आपल्या दुसर्‍या अपत्याला, मुलाला जन्म दिला. त्यानंतर करिना कपूरही तिच्याप्रमाणेच पुन्हा आई बनणार का, या (नसत्या) चर्चेला ऊत आला आहे. एकेकाळी शाहिद आणि करिनाचे प्रेमप्रकरण सुरू होते व कोणत्या तरी अनाकलनीय कारणावरून दोघे अचानक वेगळे झाले. (तितक्याच आश्‍चर्यकारक रीतीने करिना सैफबरोबर दिसू लागली!) आता पुलाखालून (मिठी नदीचे!) बरेच पाणी वाहून गेले आहे आणि दोघे आपापल्या संसारात सुखी आहेत. मात्र, तरीही अनेक लोक मीराबरोबर करिनाची तुलना करीत असतात. करिना तैमूरची आई बनली आहे आणि आता तिला ‘तू दुसर्‍यांदा आई कधी होणार?’ असा (आगाऊ) प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे.

करिना व सैफचे लग्‍न झाल्यावर लगेचच करिनाला मातृत्वाबाबत विचारले जाऊ लागले होते. तिचा गर्भारपणाचा काळही बराच चर्चेत राहिला. करिनाने या काळातही सुट्टी न घेता काम सुरूच ठेवले होते. 20 डिसेंबर 2016 ला तैमूरचा जन्म झाला. आज तो सर्वात लोकप्रिय स्टारकिड बनला आहे. तो आता शाळेतही जाऊ लागला असल्याने लोकांनी करिनाला दुसर्‍या बाळाबाबतची पृच्छा सुरू केली आहे. नुकतेच ती आपली खास मैत्रीण अमृता अरोराबरोबर एका चॅट शोमध्ये गेली होती. त्यावेळीही तिला हा प्रश्‍न विचारल्यावर तिने पटकन ‘आणखी दोन वर्षांनी!’ असे उत्तर देऊन टाकले. तैमूरच्या जन्मानंतर लगेचच करिनाने आपले शरीर पुन्हा सुडौल बनवून ‘वीरे दी वेडिंग’सारखा चित्रपट केला होता. त्यामुळे इतक्यातच ती पुन्हा गर्भवती होईल असे तिच्या व्यावसायिक जीवनावरूनही वाटत नाही. तिकडे सैफ आणि अमृता सिंहची थोरली कन्याही आता चित्रपटात आली आहे. इतक्या मोठ्या मुलांचा बाप असलेला सैफ तैमूरची कशी काळजी घेतो, असे करिनाला विचारले असता तिने ‘सैफला तैमूरसोबत खेळणे, त्याच्या सहवासात वेळ घालवणे अतिशय आवडते’ असे उत्तर दिले.