Fri, Nov 24, 2017 20:00होमपेज › Vishwasanchar › हिटलरच्या हाफ पँटला मिळणार लाखोंची किंमत!

हिटलरच्या हाफ पँटला मिळणार लाखोंची किंमत!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

न्यूयॉर्क : साठ लाख ज्यूंची हत्या करणारा आणि जगाला दुसर्‍या महायुद्धाच्या खाईत लोटणारा जर्मनीचा हुकूम अ‍ॅडॉल्फ हिटलर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी त्याचे चर्चेत येणे हे काहीसे ‘हटके’ कारणामुळे आहे. अमेरिकेत होणार्‍या एका लिलावात हिटलरच्या चक्‍क बॉक्सर शॉर्टस्ची (हाफ पँट) बोली लागणार आहे. हिटलरच्या या हाफ पँटला 5,000 अमेरिकी डॉलर (भारतीय रुपयांत सुमारे 3,19,800 लाख रुपये) इतकी बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अमेरिकेच्या अलेक्झांडर हिस्टॉरिकल ऑक्शन्सने दिलेल्या माहितीनुसार, पांढर्‍या रंगाची ही हाफ पँट काहीशी हटके आहे. तिची लांबी 19 इंचाची असून, कमरेतील जाडी 39 इंचाची आहे. या पँटवर हिटलरच्या नावाची आद्याक्षरे ‘ए.एच’ सुद्धा आहेत. हिटलरची ही हाफ पँट ऑस्ट्रियाच्या पार्कहोटल ग्राज या हॉटेलमध्ये राहिली होती. 1938 मध्ये हिटलर या हॉटेलमध्ये राहिला होता. प्रतिज्ञापत्रात लिहिलेल्या माहितीनुसार, या हाफ पँटचा लिलाव करणारा व्यक्‍ती हा पार्कहोटल ग्राज हॉटेलच्या मालकाचा नातू आहे. हिटलरने 3 ते 4 एप्रिल 1938 या कालावधीत या हॉटेलमध्ये मुक्‍काम ठोकला होता. दरम्यान, हिटलरच्या आत्मचरित्राच्या हस्तलिखिताची दुर्मीळ प्रतही या लिलावात ठेवण्यात येणार आहे. हा लिलाव ऑनलाईन पद्धतीने होणार असून, 13 सप्टेंबरपासून या लिलावास सुरुवात होईल.