Sat, Jan 19, 2019 06:16होमपेज › Vishwasanchar › अमेरिकेत शिक्षणाच्या बाबतीत हिंदू आघाडीवर

अमेरिकेत शिक्षणाच्या बाबतीत हिंदू आघाडीवर

Published On: Jan 11 2019 1:22AM | Last Updated: Jan 10 2019 8:13PM
वॉशिंग्टन : अमेरिकेत धर्माच्या आधारे शैक्षणिक स्थितीबाबतची एक पाहणी करण्यात आली. त्यामध्ये हिंदू धर्माचे लोक अव्वल स्थानावर असल्याचे दिसून आले. अमेरिकेत आर्थिकद‍ृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर 4 वर्षांची कॉलेजची पदवी महत्त्वाची मानली जाते.  सुप्रसिद्ध संशोधन संस्था प्यू रिसर्चनुसार पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यात हिंदू सगळ्यात (77 टक्के) आघाडीवर आहेत. त्यानंतर युनिटेरियन युनिव्हर्सलिस्ट (67 टक्के) यांचा नंबर लागतो. युनिटेरियन युनिव्हर्सलिस्ट मुक्‍त विचारांचे आहेत. यानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यात यहुदी म्हणजेच ज्यू लोकांचा (59 टक्के) नंबर लागतो. तसेच अँजलिकन चर्च (59 टक्के) तर एपिस्कोपल चर्चचे (56 टक्के)  विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण करतात, असे दिसून आले. 2014 च्या ‘रिलिजियस लँडस्केप स्टडी’च्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलेली आहे. ज्यात शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर अमेरिकेतील 30 धार्मिक समुदायांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेतील 35 हजार पदवीधारकांचा समावेश होता.