एक रुपयात इडली विकणार्‍या आजीबाई

Published On: Sep 12 2019 1:45AM | Last Updated: Sep 11 2019 8:59PM
Responsive image
इडली विकणार्‍या आजीबाई


चेन्‍नई : तामिळनाडूतील एक आजीबाई केवळ एक रुपयात आजही इडली विकतात. 82 वर्षांच्या कमलाथल नावाच्या या आजीबाई कोयंबतूर येथे राहतात. त्यांची स्वस्त, पण मस्त अशी इडली-सांबार लोकप्रिय आहे. 

सकाळी सहा वाजताच ग्राहक त्यांच्या दारात इडली-सांबारचा नाश्ता करण्यासाठी हजर असतात. त्या इडली-सांबार बनवण्यासाठी पारंपरिक पद्धतीचाच वापर करतात. अजूनही त्या चुलीवर एका मोठ्या भांड्यात इडल्या बनवतात. सुमारे तीस वर्षांपूर्वी त्यांनी इडल्या विकणे सुरू केले होते. आजही त्या केवळ एक रुपयातच इडली विकतात हे विशेष. नफा कमवणे हा त्यांचा हेतू नसून यानिमित्ताने लोकांच्या पोटात चार घास जातात याचे त्यांना समाधान आहे. त्या रोज एक हजार इडल्या बनवतात आणि इडली-सांबार बनवण्याचे हे काम त्या एकटीनेच करतात हे विशेष! त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकांपैकी बहुतांश लोक स्थानिक मजूर व गोरगरीब लोक असतात.