कमजोर पडत आहे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र

Last Updated: May 23 2020 1:46AM
Responsive image
संग्रहीक छायाचित्र


नवी दिल्‍ली : पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आपल्याला सौर विकिरणापासून वाचवत असते. मात्र, आता हे चुंबकीय क्षेत्र कमजोर पडत आहे. गेल्या दोन शतकांच्या काळात पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राने दहा टक्के तीव—ता गमावली आहे.

पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी हे चुंबकीय क्षेत्र नितांत गरजेचे आहे. सूर्यापासून होणारे रेडिएशन (विकिरण) आणि अंतराळातून येणार्‍या भारीत कणांपासून ते पृथ्वीवासीयांना वाचवते. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकादरम्यानचा ‘दक्षिण अटलांटिक अ‍ॅनोमली’ या परिसरावर हे क्षेत्र कमजोर झाल्याचे आढळले आहे. गेल्या 50 वर्षांच्या काळात तेथील एका मोठ्या भागात यामध्ये वेगाने घट झाली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या संशोधकांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यासाठी ‘स्वार्म’ सॅटेलाईटने पाठवलेल्या डेटाचा आधार घेण्यात आला आहे. हा सॅटेलाईट चुंबकीय क्षेत्र बनवणार्‍या विविध चुंबकीय संकेतांची ओळख आणि मोजमाप करतो. गेल्या पाच वर्षांमध्ये आफ्रिकेच्या नैऋत्येस कमी तीव—तेचे दुसरे केंद्र विकसित झाले आहे. चुंबकीय क्षेत्र कमजोर पडल्याने उपग्रह आणि अंतराळ यानांमध्येही समस्या निर्माण होऊ शकतात.

औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल १९६ रुग्णांची वाढ


पारनेरमध्ये शिवसेनेला धक्का; पाच नगरसेवक अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत डेरेदाखल!


नांदेड : कोरोनामुळे श्रीदत्त नामाच्या जयघोषास माहूरकर मुकणार


कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये पशुसंवर्धन जोपासण्याची पोमाजे कुटुंबियांची परंपरा


सरकारचं प्राधान्य नेमकं कशाला? फडणवीसांचा सरकारला सवाल


नंदुरबार : लागोपाठ १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह


चीनमधील कोरोनाबाबत 'डब्ल्यूएचओ'नं केला मोठा खुलासा


सांगलीत लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही : जिल्हाधिकारी 


नंदुरबार मेडिकल कॉलेजसाठी १९५ कोटींचा निधी मंजूर 


'खिलाडी'ची हवाई भरारी वादात, छगन भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश