‘बिग बँग’नंतरच्या काळात विकसित आकाशगंगेचा शोध

Last Updated: May 23 2020 1:46AM
Responsive image
संग्रहीक छायाचित्र


न्यूयॉर्क : ‘बिग बँग’ नावाच्या महाविस्फोटानंतर ब—ह्मांडाची निर्मिती झाली असे मानले जाते. या घटनेनंतर 1.5 अब्ज वर्षांनी तयार झालेल्या एका आकाशगंगेचा शोध लावण्यात आला आहे. सर्व आकाशगंगा कशा तयार झाल्या असाव्यात याबाबतच्या प्रचलित सिद्धांतांना आव्हान देणारे हे नवे संशोधन आहे.

‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही आकाशगंगा तब्बल 12.5 अब्ज वर्षांपूर्वीची आहे. लंबवर्तुळाकार रचना असलेल्या या आकाशगंगेला ‘डीएलए0817 जी’ असे नाव देण्यात आले आहे. खगोलशास्त्रज्ञ आर्थर एम. वुल्फ यांच्यावरून तिला ‘वुल्फ डिस्क’ असेही म्हटले जात आहे. एखाद्या तबकडीच्या आकाराच्या आकाशगंगांना ‘डिस्क गॅलेक्झी’ म्हटले जाते. अशा आकाशगंगांचा विकास अतिशय धीम्या गतीने होतो व त्यांना बर्‍याच उशिराने अधिक वस्तुमान लाभते असे यापूर्वीच्या निरीक्षणांमधून नोंदवण्यात आले होते. चिलीमधील ‘अटाकामा लार्ज मिलीमीटर-सबमिलीमीटर अ‍ॅरे’ या अत्यंत शक्‍तिशाली दुर्बिणीचा वापर करून ही आकाशगंगा शोधण्यात आली. आपल्या सूर्यापेक्षा 70 अब्ज पटीने अधिक वस्तुमान असलेली ही आकाशगंगा अंतराळात संथगतीने वर्तुळाकार फिरत आहे.