Tue, Oct 24, 2017 16:54होमपेज › Vishwasanchar › लंडनमध्ये दीपिका!

लंडनमध्ये दीपिका!

Published On: Sep 13 2017 1:41AM | Last Updated: Sep 12 2017 8:56PM

बुकमार्क करा

मुंबईः दीपिका पदुकोणसारखी यशस्वी अभिनेत्री सुट्टी एन्जॉय करण्यासाठी किंवा शूटिंगसाठी जगभर फिरत असते. त्यामुळे ती लंडनमध्ये आहे असे म्हटल्यावर त्यामध्ये काय विशेष असे अनेकांना वाटू शकते. मात्र, दीपिका स्वतःसाठी नव्हे तर रणवीर सिंहसाठी लंडनमध्ये गेली आहे! या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, त्यामध्ये तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. या दोघांना संजय लीला भन्साळीने चारचौघांत भेटण्यास मनाई केली आहे. त्यामुळे हे दोघे सध्या लंडनमध्ये गुपचूप भेटत आहेत.

‘पद्मावती’ चित्रपटावर या दोघांच्या अफेअरचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून संजय ही काळजी घेत आहे. दोघांनी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत खुलेपणाने एकमेकांना भेटू नये असे त्याने सांगून ठेवले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी गेलेल्या दीपिका आणि रणवीरची एकत्र छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. एका मित्राच्या लग्‍नासाठी म्हणून रणवीर सध्या लंडनला गेला आहे. त्याला भेटण्यासाठी पाठोपाठच दीपिकाही तिकडे रवाना झाली. तिथे तिने भावनेच्या भरात आपल्या एका चाहत्याबरोबर फोटो टिपून घेतला आणि ती लंडनमध्ये असल्याचे जगजाहीर झाले! रणवीर आणि ती लंडनमध्ये ‘क्वॉलिटी टाईम’ व्यतित करीत असल्याची चर्चा लगेचच सुरू झाली.