प्रदूषणकारी कार्बन डायऑक्साईडचे इंधनात रूपांतर

Published On: Sep 12 2019 1:45AM | Last Updated: Sep 11 2019 9:02PM
Responsive image
file photo


टेक्सासः

पृथ्वीचे तापमान वाढवणार्‍या ‘ग्रीनहाऊस गॅसेस’चे प्रमाण कमी करण्यासाठी टेक्सासमधील राईस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी मोठे यश मिळवले आहे. त्यांनी अशा प्रदूषणकारी वायूंचे इंधनात रूपांतर केले आहे. शिवाय यासाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रोलायजर पूर्णपणे रिन्यूएबल विजेच्या सहाय्यानेच काम करील.

युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासाठी एक कॅटेलिक रिअ‍ॅक्टर विकसित केले आहे. ते कार्बन डायऑक्साईडचा वापर करून त्याला शुद्ध आणि दाट फॉर्मिक अ‍ॅसिडमध्ये रूपांतरीत करते. राईस युनिव्हर्सिटीतील केमिकल आणि बायोमॉलेक्युलर इंजिनिअर हाओटिआन वांग यांनी सांगितले की, आतापर्यंत फॉर्मिक अ‍ॅसिड ज्या पद्धतीने बनवले जात होते त्यामध्ये त्याला स्वच्छ करण्यासाठी अतिशय

महाग आणि अत्याधिक ऊर्जा वापरणार्‍या क्रियेचा वापर होत असे. आता कार्बन डायऑक्साईडला थेटच शुद्ध आणि दाट अशा फॉर्मिक अ‍ॅसिडमध्ये रूपांतरीत करण्याची नवी पद्धत शोधण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा व्यावसायिक उपयोगही केला जाऊ शकतो. वांग आणि त्यांचे सहकारी ग्रीन हाऊस गॅसेसना उपयुक्‍त वस्तूंमध्ये रूपांतरीत करण्याबाबत दीर्घकाळापासून काम करीत आहेत. वांग यांनी सांगितले की, फॉर्मिक अ‍ॅसिडला इंधन म्हणून वापरून वीज निर्माण केली जाते. त्यापासून कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. तो पुन्हा रिसायकल करून त्याचे रूपांतर फॉर्मिक अ‍ॅसिडमध्ये केले जाऊ शकते. त्याचा वापर केमिकल इंडस्ट्रीमध्ये अन्य रसायनांसाठी फ—ीडस्टॉक म्हणूनही होऊ शकतो. तसेच तो हायड्रोजनसाठी स्टोरेज मटेरियल म्हणूनही वापरता येऊ शकतो.