Wed, Nov 14, 2018 13:12होमपेज › Vishwasanchar › See Pics : ‘तिची’ देहयष्टी सर्वात सुंदर!

See Pics : ‘तिची’ देहयष्टी सर्वात सुंदर!

Published On: Dec 07 2017 1:44AM | Last Updated: Dec 07 2017 1:44AM

बुकमार्क करा

टेक्सासः सौंदर्याचेही काही ठोकताळे असू शकतात असे एरव्ही आपल्याला वाटणार नाही, कारण ‘अ’ अधिक ‘ब’ बरोबर ‘क’ अशी गणिती सुत्रे सौंदर्याला कशी लागू करणार? मात्र काही सौंदर्यशास्त्रींचेही याबाबत काही निकष असतात. आता अशाच काही संशोधकांनी एका मॉडेलची शरीरयष्टी सर्वात ‘परफेक्ट’ ठरवले आहे. जगात सगळ्यात सुडौल बांधा हा इंग्लंडमधील या मॉडेलचा असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टेक्सासमधील काही शास्त्रज्ञ सुडौलतेच्या निकषावर नैसर्गिकरीत्या सुडौल महिलेचा गेली अनेक महिने शोध घेत होते. त्यांच्या संशोधनातून ‘केली ब्रूक’ नावाची मॉडेल ही सर्वनिकषसंपन्‍न असल्याचं सिद्ध झालं आहे.

केलीचं वय 32 असून ती जन्मत:च अत्यंत सुंदर आहे. विशेष म्हणजे सुंदर दिसण्यासाठी किंवा शरीर सुडौल करण्यासाठी तिने कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही. सुडौल बांधा आणि सौंदर्यासाठी शास्त्रज्ञांनी काही मोजमापं निश्‍चित केली होती, त्यामध्ये वजन, उंची, शरीरयष्टी, केसांची लांबी, चेहर्‍याची ठेवण वगैरे निकषांचा समावेश होता. या सगळ्या मोजमापांमध्ये ब्रूक ही एकदम फिट बसल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. वयाची तिशी ओलांडलेली असली तरीही केली अत्यंत सुंदर दिसते आणि ती एक लोकप्रिय मॉडेलही आहे. आता तिच्या या लोकप्रियतेवर शास्त्रज्ञांनीच असे शिक्‍कामोर्तब केले आहे.