दहा सेकंदांमध्ये दात स्वच्छ करणारा इलेक्ट्रिक ब्रश

Published On: Sep 12 2019 1:45AM | Last Updated: Sep 11 2019 8:28PM
Responsive image
file photo


पॅरिस :

लोकांचे आपल्या मौखिक आरोग्याकडे पुरेशा गांभीर्याने लक्ष नसते असे वेळोवेळी आढळून आलेले आहे. त्यामुळे याबाबत नेहमीच जनजागृती केली जात असते. मौखिक आरोग्यासाठीची साधनेही आता अधिकाधिक अद्ययावत बनत आहेत. आता संशोधकांनी एक असा इलेक्ट्रिक ब—श विकसित केला आहे जो केवळ दहा सेकंदांमध्येच दात स्वच्छ करू शकतो.

या ब्रशला ‘टेन सेकंडस् टूथब्रश’ किंवा ‘वाय ब्रश’ म्हणूनही ओळखले जाते. हा ब्रश सोनिक व्हायब्रशन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने काम करतो. छोट्या ब्रशना संपूर्ण तोंडात फिरवावे लागत असते. मात्र, या वाय ब्रशमध्ये सिलिकॉन की ट्रे असते, ज्यामध्ये नायलॉनच्या ब्रिस्टल्स 45 अंशाच्या कोणात लावलेल्या असतात. हा ब्रश एकाच वेळी निम्म्या तोंडाची स्वच्छता करतो. एका फ्रेंच कंपनीने हा ब्रश बनवला असून त्याला संपूर्ण तोंडाला स्वच्छ करण्यासाठी केवळ दहा सेकंद पुरेशी आहेत, असा कंपनीचा दावा आहे. पाच सेकंदांमध्ये तो जबड्यातील वरील दात आणि उरलेल्या पाच सेकंदांमध्ये खालील दात स्वच्छ करतो.