आलियाला आवडतो वरण-भात!

Last Updated: Nov 09 2019 2:07AM
Responsive image


मुंबई : अभिनेत्रींच्या आहाराबाबतही अनेकांना कुतुहल असते. विशेषतः त्या फिटनेस ठेवण्यासाठी काय काय करतात हे जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा असते. काही दिवसांपूर्वी नवोदित तारका अनन्या पांडे हिने आपल्या आहाराची माहिती दिली होती. आता आलिया भट्टच्याही डाएटबाबतची माहिती समोर आली आहे. आलियाला घरातील वरण-भातच अधिक प्रिय आहे, असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.

तिने सांगितले, मला घरचे जेवणच आवडते. अगदी घरीही ज्यावेळी माझी आई पास्ता बनवत असे त्यावेळीही मी तिच्याकडे वरण-भातच मागत असे. मला नेहमीच वरण-भात आवडत आलेला आहे. ‘कम्फर्ट फूड’ म्हणून मी भाताची खिचडी, 

फ—ेंच फ—ाईज आणि दाल-चावल यांचेच नाव घेईन! याशिवाय मला वेगवेगळी फळेही आवडतात. पायलेटस्, स्विमिंग, बॅडमिंटन अशा मार्गाने मी स्वतःला तंदुरुस्त ठेवते. रोज शारीरिकद‍ृष्ट्या सक्रिय राहणे गरजेचे आहे असे मला वाटते. अगदी कामाच्या व्यस्ततेतूनही व्यायामासाठी वेळ काढलाच पाहिजे.