होमपेज › Vidarbha › यवतमाळ पुर्वपदावर येण्यास झाली सुरूवात

यवतमाळ पुर्वपदावर येण्यास झाली सुरूवात

Last Updated: May 25 2020 12:25PM
नागपुर : पुढारी वृत्तसेवा 

यवतमाळातील कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे रिपोर्ट आज (दि.२५) सकाळी वैद्यकिय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यात यवतमाळ येथील ५, दिग्रस १, दारव्हा ३, आर्णी १, घाटंजी १, पुसद २, कळंब १, माहुर १, छत्तीसगढ़ १, येथील रिपोर्टचा समावेश आहे. तसेच एक रिपोर्ट अप्राप्त आहे, असे महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.

१७ पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डमध्ये ३१ जण भरती

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये १७ ॲक्टिव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण ३१ जण आहे. यात १४ प्रिझमटिव्ह  (शक्यता असलेले) केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे. 

वाशिम : लॉकडाऊनमध्ये चिकनचे दर २४० रुपये 

रविवारी (दि.२४) चार जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ११३ वर गेली असून यापैकी ९६ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये १७ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात १३ जण तर गृह विलगीकरणात ४९१ जण आहेत.