Sat, Nov 17, 2018 04:26होमपेज › Vidarbha › कॅटरिनाचे  बच्चे गेले कुठे?

कॅटरिनाचे  बच्चे गेले कुठे?

Published On: Jun 03 2018 7:39AM | Last Updated: Jun 03 2018 7:54AM नागपूर : प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची आन-बान-शान समजल्या जाणार्‍या हसिना कॅटरिनाने काही महिन्यांपूर्वी पिल्लांना जन्म दिला. परंतु, शोकांतिका अशी आहे की, आज तिच्या जन्म दिलेल्या शावकांतून एकही शावक तिच्याजवळ स्तनपान करण्यासाठी नसल्याने शावके अखेर गेली तरी कुठे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर तिने आपल्या पिल्लांचा शोध घेणे सुरू केले आहे.  वन विभागासमोर आता नवीन डोकेदुखी सुरू झाली आहे.

कॅटरिना जागा सोडत नसून, बोर धरण परिसरात भ्रमंती करीत सतत प्रवास या उमेदीने करीत आहे की, तिची शावकांसोबत भेट होईल. असे तर नाही की, त्यांनी या जगाचा निरोप घेतला असावा व वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी याचा ऊहापोह न करता गुपचूप सोक्षमोक्ष लावल्याने एकाचाही थांगपत्ता लागत नसावा. हेच कारण आहे की, सध्या जंगल भ्रमंती करण्याकरिता येणार्‍या पर्यटकांना जास्त प्रयत्न न करता कॅटरिनाचे सहजरीत्या दर्शन घडते व ते सुखावून जातात.