Tue, Apr 23, 2019 02:26होमपेज › Vidarbha › बाळाचे नाव ठेवण्यासाठी थेट मतदान प्रक्रिया!

बाळाचे नाव ठेवण्यासाठी थेट मतदान प्रक्रिया!

Published On: Jun 18 2018 10:05AM | Last Updated: Jun 18 2018 10:05AMगोंदिया : वृत्तसंस्था

बॅलेट पेपरवर मतदान घेऊन नवजात बालकाचे नामकरण केल्याची गमतीशीर घटना गोंदियात घडली आहे. कुटुंबातील सदस्यांचे मत विचारात घेऊन सर्वसाधारणपणे लहान बाळाचे नामकरण केले जाते. परंतु, देवरी येथील बंग कुटुंबाने थेट मतदान प्रक्रियेचा आधार घेत बाळाचे नाव ठेवले.

कुटुंबातून नावासाठी तीन पर्याय समोर आल्याने बंग कुटुंबासमोर पेच निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी या कुटुंबाने मतदान घेण्याची नामी शक्कल लढवली. यावेळी कौटुंबिक सोहळ्याला निवडणूक कक्षाचे स्वरूप आले होते. बाळाच्या नावासाठी 149 जणांनी मतदान केले. सर्वाधिक 92 मते ही ‘युवान’ या नावाच्या बाजूने झाल्याने याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.