Thu, Jun 27, 2019 18:03होमपेज › Vidarbha › नंदुरबार : जमावाचा पोलिस वाहनावर हल्ला, २ पोलिस जखमी 

नंदुरबार : पोलिसांवर हल्ला, २ पोलिस जखमी 

Published On: Apr 15 2019 2:05PM | Last Updated: Apr 15 2019 2:05PM
नंदुरबार  : प्रतिनिधी

तालुक्यातील नगाव येथे हाणामारीचे प्रकरण सोडवायला गेलेल्या पोलिसांवरच जमावाने दगडफेक करीत हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाले असून पोलिस वाहनाचे नुकसान झाले आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील नगाव येथे १३ एप्रिल, २०१९ रोजी रात्री अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास भिल्ल आणि कोळी वसाहतीमधील दोन गटांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण सोडवण्यासाठी नंदुरबार तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी वाहनाने त्या ठिकाणी गेले. तेथे ज्ञानेश्वर शिवराम भिल, तुकाराम शेमले, सरदार भिल, अंकुश चुनीलाल भिल यांच्यासह सहा जणांनी जमावासमवेत येऊन पोलिस वाहनावर हल्ला केला. वाहनावर तसेच पोलिसांवर दगडफेक केली. नंतर काठ्‍या घेऊन वाहनावर आणि पोलिसांवर हल्ला केला. यामध्‍ये पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रकाश अहिरे आणि पोलिस हेडकॉन्स्टेबल बापू बागुल हे दोन्ही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिस वाहनाच्या काचाही फुटल्या. पोलिस ठाण्यात या सहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाण केल्याप्रकरणी १४ एप्रिल रोजी दुपारी गुन्हा नोंदवण्यात आला.