नागपुरात आणखी २ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह; १३ वर्षाच्या मुलाला लागण

Last Updated: Mar 30 2020 9:15AM
Responsive image


नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत आज सोमवारी सलग पाचव्या दिवशी दोनने वाढ झाली. सोमवारी सकाळी आणखी दोन रूग्णाचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल असलेल्या एका कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने या दोघांना लागण झाली  आहे.

वाचा - सलून दुकाने बंद; दाढी वाढली, केसांचे झाले जंजाळ

रूग्णाच्या संपर्कामुळे ४४ वर्षीय महिला आणि १३ वर्षाचा मुलगा संक्रमित झाला आहे. १८ मार्चला दिल्लीहून परतलेल्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह निघाला होता. याच रूग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या परिवारातील आणखी चार व्यक्ती शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळल्या. शनिवारी आढळलेल्या दोनपैकी एक पॉझिटिव्ह रूग्णसुध्दा दिल्लीहून परतलेल्या रूग्णाच्या संपर्कात आला होता. १४ मार्चनंतर आतापर्यंत एका पाठोपाठ एक आणखी १३ रूग्ण वाढले आहे.

वाचा - इस्लामपुरातील चौघांचे भुईंजमध्ये वास्तव्यarticleId: "185577", img: "Article image URL", tags: "corona, positive, patient, nagpur , नागपूर , कोरोना, स्वॅब चाचणी ",