Sun, Feb 17, 2019 09:07होमपेज › Vidarbha › थरार! ताडोबात वाघोबांनी अडवली पर्यटकांची जिप्सी

थरार! ताडोबात वाघोबांनी अडवली पर्यटकांची जिप्सी

Published On: Feb 23 2018 1:17AM | Last Updated: Feb 23 2018 12:29AMनागपूर : प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबातील पुन्हा एक थरार समोर आला आहे. सध्या रोज वाघाचे दर्शन पर्यटकांना होत आहे; पण वाघोबाचे दर्शन जीवावर कसे बेतू शकते, हे  व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसून येते.
दोन वाघ रस्त्यावर बसले असताना जिप्सीचा ताफा तिथे पोहोचला आणि मग एक वाघ जिप्सीच्या इतका जवळ आला की, सारेच पर्यटक जीव मुठीत घेऊन गप्प झाले.

आजपर्यंत कुठली अनुचित घटना घडली नसली तरी पुढे होणार नाही, याची शाश्‍वती नसल्याने पर्यटकांनी वाघाशी सुरक्षित अंतर ठेवूनच दर्शन घ्यायला हवे; पण अती हव्यासापोटी असे प्रसंग उद्भवत आहेत. यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे वन्यजीव प्रेमींना वाटत आहे.