Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Vidarbha › जळगाव : बसमधून महिलेचे २ लाखाचे दागिने लंपास

जळगाव : बसमधून महिलेचे २ लाखाचे दागिने लंपास

Published On: Apr 30 2018 10:14PM | Last Updated: Apr 30 2018 10:14PMजळगाव : प्रतिनिधी

पारोळा येथे आज दुपारी अज्ञात चोरट्यांनी जळगाव येथील महिलेच्या बॅगमधून सुमारे दोन लाख अडतीस हजाराचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. शहरात चोऱ्यांचे सत्र संपता संपत नाही हे, घरफोड्या, बस मधून चोऱ्यांचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज पारोळा शहरात दुपारी अडीच वाजेच्या दुमराड धुळे येथून जळगाव जाण्यासाठी बस मध्ये आशाबाई भिमराव पाटील (रा. शिवराणा कॉलनी, जळगाव) या बसमध्ये बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या बागेतून अज्ञात चोरट्यानी एक लाख ऐंशी हजाराची मंगल पोत, अठ्ठेचाळीस हजाराचे दोन तोळे सोन, दहा हजार रुपये रोख असे एकूण दोन लाख अडतीस हजाराचे दागिने व रोख रक्कम लंपास केले. चोरटे वाटेतच बसमधून उतरून फरार झाले. बस पारोळा येथून जळगावकडे निघाली असता किसान महाविद्यालाजवळ महिलेस ही घटना समजली. यानंतर पारोळा पोलिसात त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो हे कॉ बापू पाटील करीत आहेत.