Sat, Jun 06, 2020 11:14होमपेज › Vidarbha › भीषण अपघात! भंडाऱ्यात वडापची टॅक्सी नदीत कोसळली, सहा ठार

भीषण अपघात! वडापची टॅक्सी नदीत कोसळली, सहा ठार

Published On: Jun 18 2019 7:50PM | Last Updated: Jun 18 2019 8:03PM
भंडारा : पुढारी ऑनलाईन

भंडारा जिल्ह्यातील साकोली-लाखांदूर मार्गावर मंगळवारी दुपारी धर्मपुरी जवळ भीषण अपघात झाला. वडापच्या टॅक्सीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅक्सी नदीत कोसळली. यात सहा महिलांचा मृत्यू झाला. तर इतर सहाजण गंभीर जखमी आहेत. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्मापुरी येथील चुलबंद नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावरुन ट्रॅक्स टॅक्सी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून टॅक्सी नदीत कोसळली. दुपारी ३.३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला तेव्हा टॅक्सीतून १२ जण प्रवास करत होते. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर इतर सहा जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये चार विद्यार्थिनींचा समावेश असून १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर बीएससीच्या प्रवेशासाठी त्या साकोली येथे आल्या होत्या.

अपघातानंतर जखमींना साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याची शक्यता आहे.