Fri, Nov 16, 2018 10:51होमपेज › Vidarbha › शिवस्मारकाच्या उंचीवरून विधीमंडळात गदारोळ

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधीमंडळात गदारोळ

Published On: Jul 20 2018 2:11PM | Last Updated: Jul 20 2018 2:11PMनागपूर : प्रतिनिधी

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप विरोधकांनी करत आज विधानसभेत गदारोळ केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कागदपत्राचा हवाला देत शिवस्मारकाची उंची १८ मीटरने कमी केल्याचा आरोप केला.

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा करण्यात येत आहे. यांच्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची जास्त असू नये, असा यामागे डाव असल्याचा आरोप पवार यांनी केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील यांनीही या आरोपाचा पुनरुच्चार केला. यावरून गदारोळ झाला.