Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Vidarbha › जळगाव : जारगावमध्ये जवानाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

जळगाव : जारगावमध्ये जवानाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या

Published On: May 15 2018 2:43PM | Last Updated: May 15 2018 2:43PMजळगाव : प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील ४० वर्षे वयाच्या  जवानाने राहत्या घरी छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या सहा महिन्यांपासून घरी आल्यानंतर कार्यालयाकडून वारंवार सेवेत परत येण्यासाठी पत्रव्यव्हार  सुरू होता, जवानांच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही, या घटनेची नोंद पाचोरा पोलिस ठाण्यात झाली आहे.

जारगाव तालुका पाचोरा येथील नितीन दिलीप पाटील हे सन २००४ मध्ये इंडियन आर्मीत भरती झाले होते. चौदा वर्षाच्या सेवेत त्यांनी सुटीवर घरी आल्यानंतर सुटी संपल्यानंतर वेळेत ट्यूटी जॉंईंड केली मात्र या वेळी गेल्या सहा महिन्यांपासून सुटीवर आल्यानंतर परत जाण्यासाठी ते टाळाटाळ करीत होते. या आठवड्यात जातो पुढील आठवड्यात जाईल असे सांगून वेळ निभाऊन नेत होते. दि. १५ रोजी सकाळी ९ वाजता स्वतंत्र रुम असलेल्या घराचा दरवाजा आतून बंद करून पाटील यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी दहा वाजून गेले तरी दरवाजा उघडला नाही म्‍हणून कुटुंबियांनी खोलीत बघितले असता त्यांनी आत्‍महत्या केली असल्याचे आढळले.

त्‍यांच्यावर जारगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन पाटील यांचे पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.