Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Vidarbha › ..तर आमचे आबा वाचले असते : स्मिता पाटील

..तर आमचे आबा वाचले असते : स्मिता पाटील

Published On: Dec 18 2017 12:03PM | Last Updated: Dec 18 2017 12:14PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

व्यसनामुळे आपल्यासोबतच  आपले कुटुंबही उद्ध्वस्त होते. त्यामुळे नागरिकांनी व्यसनापासून दूर रहावे, असे कळकळीचे आवाहन राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी केले.

‘राजकीय कामाच्या तणावातून आबांनी तंबाखू खायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचे तंबाखूचे व्यसन वाढले. त्याच व्यसनामुळे आबा आपल्याला सोडून गेले’ असे स्मिता म्हणाल्या.

गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. अभय बंग यांच्या सर्च या प्रकल्पाच्या मुक्तीपथच्या आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यसनामुळे आबा आपल्याला सोडून गेल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात आबा यांच्या पत्नी आ. सुमन पाटील, डॉ. अभय बंग,पोलिस अधीक्षक अभिनव देशमुखआणि मोठ्या प्रमाणात नागरिकउपस्थित होते. 

संबंधित बातमी :

आर.आर आबांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न (Photo)