Fri, Nov 16, 2018 19:16होमपेज › Vidarbha › गडचिरोली: भीषण अपघातात 7 जण ठार

गडचिरोली: भीषण अपघातात 7 जण ठार

Published On: Jul 01 2018 1:07PM | Last Updated: Jul 01 2018 1:09PMगडचिरोली: पुढारी ऑनलाईन

गोविंदगावाजवळ रविवारी सकाळी झालेल्या अपघातात सात जण ठार झाले. जिमलगट्टापासून 3 किलो मीटर अंतरावर हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन लहान बाळांचा देखील समावेश आहे. 

चंद्रपूर येथून येणाऱ्या बलेनो गाडी (एम.एच.बीएफ 4861) आणि काळी-पिवळी (एम.एच.34-0791) यांच्यात सकाळी 9.30च्या सुमारास भीषण अपघात झाला. यात सात जण ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात अन्य काही जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांच्यावर जिमलगट्टा येथील प्राथमिक उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात काळी-पिवळीचे चालक आणि बलेनो गाडीतील दोन लहान मुलांचा देखील मृत्यू झाला. 

बलेनो गाडीत चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प येथे राहणारे मोहुर्ले कुटुंब असल्याचे समजते.