Thu, Jul 18, 2019 00:34होमपेज › Vidarbha › संशोधक दादाजी खोब्रागडे यांचं निधन

संशोधक दादाजी खोब्रागडे यांचं निधन

Published On: Jun 03 2018 9:20PM | Last Updated: Jun 03 2018 9:20PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

तांदळाचे विविध वाण शोधणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे आज सायंकाळी निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

 दादाजी रामाजी खोब्रागडे यांच्याकडे मोजकीच जमीन होती. या जमिनीतही त्यांनी शेतीतील धानावर विविध प्रयोग केले. फक्‍त तिसरी शिकलेले खोब्रागडे यांनी एचएमटी धानाची जात विकसित केली होती. खोब्रागडे यांनी धानाच्या अनेक जाती विकसित केल्या. पाच राज्यात एक लाख हेक्‍टरवर एचएमटीची लागवड होते. गेल्या तीस वर्षांमध्ये केवळ दीड एकर शेतीत विविध प्रयोग करून धानाचे नऊ वाण संशोधित केले होते. 

या संशोधनाबद्दल दादाजींना १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित पुरस्कार प्राप्‍त झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१० साली जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते.