Thu, Sep 20, 2018 02:55



होमपेज › Vidarbha › एक रुपयाच्या कर्जासाठी शेतकर्‍याला धरले वेठीस

एक रुपयाच्या कर्जासाठी शेतकर्‍याला धरले वेठीस

Published On: Jan 18 2018 9:17AM | Last Updated: Jan 18 2018 9:17AM

बुकमार्क करा




नागपूर : प्रतिनिधी

बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील एका शेतकर्‍याला फायनान्स कंपनीने फक्‍त एक रुपयाच्या कर्जासाठी वेठीस धरले आहे. आधी एक रुपयाचा भरणा करा, त्यानंतर एका महिन्याने ना हरकत प्रमाणपत्र देऊ, असा अजब फतवा कंपनीने काढून एका शेतकर्‍याची अवहेलना केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.

जगदीश दिनकर कांडेलकर असे या शेतकर्‍याचे नाव असून या शेतकर्‍याने फायनान्स कंपनीकडून त्यांच्याच कंपनीचा ट्रॅक्टर 65 लाख रुपयांना कंपनीकडून फायनान्स करून घेतला होता. तर कंपनीने कर्जापोटी दिलेल्या हप्त्यानुसार सर्व हप्तेही भरले, तर शेवटचा हप्ता 19 डिसेंबर रोजी 15 हजार रुपये भरून पूर्ण रक्‍कम खात्यात जमा करून खाते
नील केले. दरम्यान, किडनी आजाराच्या उपचारासाठी पुन्हा नव्याने कर्ज घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी कंपनीकडे केली होती. मात्र, तुच्याकडे एक रुपया पुन्हा कर्जरूपी निघत असून ते भरा, नंतर तुम्हाला एका महिन्याने ना हरकत प्रमाणपत्र देऊ, असे फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍याने शेतकर्‍याला सांगितले. त्यामुळे शेतकर्‍याने मी हे पैसे भरतो मात्र मला त्वरित ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली असता अधिकार्‍यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करीत सदर शेतकर्‍याची अवहेलना केल्याची बाब समोर आली आहे.