Sun, Sep 22, 2019 21:47होमपेज › Vidarbha › ...तर शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार : राजू शेट्टी

'...तर शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल'

Published On: Jun 11 2019 11:00AM | Last Updated: Jun 11 2019 11:02AM
अमरावती : पुढारी ऑनलाईन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. वरूड) येथे झालेल्या दुष्काळ पाणी परिषदेत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.  

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आठ दिवसांत तातडीने पंचनामे करावेत व वाळलेल्या संत्रा बागेला १ लाख तसेच टँकरने पाणी घालून जगविलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रूपये तातडीची मदत करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी या परिषेदत केली. गरज पडल्यास शेतकरी प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार, असा इशाराही त्यांनी दिलाय. या परिषेदत अनेक मागण्या सर्वानुमते करण्यात आल्या.

जलयुक्त शिवार योजनेमध्ये वरूड तालुक्यात ५०० कोटी रूपये खर्चूनही कूपनलिकेला १२०० फुटांपर्यंत पाणी लागेना. मग इतका पैसा खर्च करूनही हे पाणी मुरले कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे यामध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची निवृत्त अभियंता व सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विदर्भात दुष्काळ स्थिती तीव्र आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी येथील दुष्काळी भागाची पाहणी केली. जनावारांना चारा नाही, पाणी नाही, असे सांगत त्यांनी सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले.  
 

अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार!
आज लोणी ता. वरूड जि. अमरावती येथे दुष्काळ पाणी परिषद पार पडली. यावेळी या परिषदेत विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकर्यांचे आठ दिवसात तातडीने पंचनामे करावे व वाळलेल्या... https://t.co/45AqqKWo2U

— Raju Shetti (@rajushetti) June 11, 2019