Tue, Jul 23, 2019 01:54होमपेज › Vidarbha › प्रणवदांचे भाषण एकता दर्शवणारे; संघाकडून कौतुक

प्रणवदांचे भाषण एकता दर्शवणारे; संघाकडून कौतुक

Published On: Jun 09 2018 1:38AM | Last Updated: Jun 09 2018 1:38AMनागपूर ः वृत्तसंस्था

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेले भाषण देशातील विविधतेतील एकता आणि सर्व समावेशकता दर्शविणारे होते. त्यांच्या भाषणातून देशाचा गौरवशाली इतिहास मांडला गेला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली आहे.  

आरएसएसचे प्रचारप्रमुख अरुणकुमार यांनी पीटीआयशी बोलताना आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रणव मुखर्जी यांचे आभार मानले. ते म्हणाले, मुखर्जी यांनी 5 हजार वर्षांची सांस्कृतिक परंपरा भाषणातून मांडली. भारतात विविधतेतून उभारलेली एकता त्यांनी सांगितली. त्यांनी राष्ट्र, राष्ट्रीयत्व आणि देशभक्‍ती याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. 

मुखर्जींची भेट महत्त्वपूर्ण घटना  : अडवाणी
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसच्या मुख्यालयाला दिलेली भेट हा एक ऐतिहासिक क्षण होता. भारताच्या समकालीन इतिहासात उदार कल्पना आणि भारतीय राष्ट्रवादाच्या प्रकाशझोतात प्रकाशित होणारा हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम होता, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्‍त केले आहे. निस्वार्थ आणि परस्परांच्या भावनांचा आदर करत नवभारत निर्मिती व्हावी. यासाठी सहिष्णुता, सुसंवाद आणि सहकार्याची गरज आहे, असा त्यांनी मौलिक सल्ला दिल्याचे अडवाणी यांनी सांगितले.