नागपूर : प्रतिनिधी
मुंबईत हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ‘ङ्गमुस्कानफ’ आणि ‘ङ्गस्माईलफ’ अंतर्गत 20 हजार 112 बालके शोधून त्यांच्या कुंटुबियांकडे सुपूर्द केली आहेत, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली. बालकांचे अपहरण रोखण्यासाठी झोपडपट्टी भागात जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ही त्यांनी जाहीर केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 18 वर्षाखालील हरविलेल्या लहान मुलांच्या बाबतीत तक्रार दाखल होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. चार महिन्याच्या आत हरविलेले मुल सापडले नाहीतर त्याबाबतचा तपास अनैतिक मानवी वाहतूक माहिती कक्षामार्फत करण्यात येतो. मुंबइतील सर्व परिमंडळात असे कक्ष स्थापन करण्यात आल्याचे डॉ. पाटील म्हणाले.