Sat, Mar 23, 2019 18:11होमपेज › Vidarbha › राणेंचा डिसेंम्बर अखेर शपथ विधी?

राणेंचा डिसेंम्बर अखेर शपथ विधी?

Published On: Dec 20 2017 1:49AM | Last Updated: Dec 20 2017 1:32AM

बुकमार्क करा

नागपूर :  चंदन शिरवाळे

एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना मंत्री करण्यास शिवसेनेचा असलेला विरोध दूर करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेरीस यश आले आहे. 27 डिसेंम्बर रोजी राणे यांच्या शपथविधी होण्याची शक्यता आहे.

राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांना भाजपमधूनच विरोध झाल्याने राणे यांना वेसन लागली. भाजपमध्ये घेतल्यास शिवसेनेची नाराजी ओढवून घेण्यास कोणीही तयार नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी राणे यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. भाजपची ही राजकीय चाल लक्षात आलेल्या शिवसेनेने राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाला आणखी तिव्र विरोध केला.

राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर तेच पुन्हा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. तरीही राणे यांचा विचार झाला नाही. 
   राणे यांच्या मंत्री मंडळात समावेशा बाबत मुख्यमंत्री सुदधा हूलकावण्या देत होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी राणे यांना मंत्रीमंडळात  घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या नेत्यांची समजूत काढण्यात त्यांना यश आले आहे.  नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे यांना मंगळवारी रात्री बोलावून घेतले. या दोघांमध्ये मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. 27 डिसेंम्बर रोजी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.