नागपूर : प्रतिनिधी
उपराजधानीत शुक्रवारी बरसलेल्या मुसळधार पावसानंतर विधानभवन परिसरात पाणी साचू नये आणि सदस्यांचा त्रास वाचावा, यासाठी युद्धपातळीवर तब्बल दीडशे मीटरचा रॅम्प बांधण्यात आला. तीन खोल्यांच्यासमोर बारा फूट लांब व अडीच फूट भिंत उभारण्यात आली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारचे कामकाजावर पावसामुळे पाणी फेरले गेले. संपूर्ण परिसर जलमय झाला आणि वीज पुरवठा बंद केल्याने सर्वत्र अंधार झाला होता. पावसामुळे हाहाकर उडाल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले. यापुढे अशी स्थिती उद्भवू नये, यासाठी शनिवारी सर्वच विभागांनीतात्काळ एकमेकांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना केल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर कामे केली. विधानभवनातील तीन खोल्यांनमध्ये पाणी शिरले. त्यामुळे वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. या खोल्यांच्यासमोर अडीच फूट उंच, बारा फूटलांब भिंती बांधण्यात आल्या. व मुख्य प्रवेशद्वारापासून विधानसभेच्या पायर्यांत रॅम्प तयार केला. याची लांबी सुमारे दीडशे मीटर आहे.आमदार निवासाच्या प्रवेशद्वाराजवळ फ्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. विधानभवन परिसरातही महापालिकेच्या चुकीमुळे
पाणी शिरले. त्यामुळे आता योग्य काळजी घेण्यात आली आहे. याचा सदस्य वनागरिकांना त्रास होणार नाही.