Thu, Apr 25, 2019 13:26होमपेज › Vidarbha › अस्वलांच्या कळपाचा हल्ला; १ ठार, ३ जखमी

अस्वलांच्या कळपाचा हल्ला; १ ठार, ३ जखमी

Published On: Jan 07 2018 6:53PM | Last Updated: Jan 07 2018 6:53PM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा (इसापूर) शेतशिवारात अस्वलाच्या कळपाने अचानक हल्ला केल्याने एक जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना काल शनिवारी घडली.

अस्‍वलाच्या कळपाच्या हल्‍लयात केशव नारायण झिलपे असे ठार झालेल्या नागरिकाचे नाव आहे. तर, गंभीर जखमींमध्ये महादेव ढिगू लोणारे, शंकर तुकाराम भागडकर, नीलेश शंकर भागडकर या तिघांचा समावेश आहे. तिन्ही गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.