Sat, Jun 06, 2020 09:55होमपेज › Vidarbha › ...तोपर्यंत खडसेंचे मंत्रिमंडळात पुनरागमन अशक्य!

...तोपर्यंत खडसेंचे मंत्रिमंडळात पुनरागमन अशक्य!

Published On: Dec 23 2017 2:15AM | Last Updated: Dec 23 2017 2:35AM

बुकमार्क करा

नागपूर : दिलीप सपाटे 

माजी महसूलमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मार्ग खडतर असून त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश कठीण असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी राज्य सरकारने न्या. झोटींग समिती नेमली असली तरी ही समिती निरर्थक ठरली आहे. खडसेंवरील विविध आरोपांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हा एसीबी चौकशीचा अहवाल महत्वाचा असल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. त्यामुळे न्यायालयात निकाल लागेपर्यंत खडसेंचे मंत्रिमंडळात पुनरागमन अशक्य असल्याचे स्पष्ट संके त मुख्यंत्र्यांनी दिले. 

पुण्यातील एमआयडीसीतील भूखंड पत्नी व मुलीच्या नावे खरेदी केल्याने खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्य सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटींग यांचा आयोग नेमला. या आयोगाने मे महिन्यात आपला अहवाल राज्य सरकारला दिला. त्यामध्ये  खडसे यांच्यावर ताशेरे ओढले असले तरी थेट दोषी ठरविण्यात आलेले नसल्याने त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला परदेशात कॉल केल्याच्या आरोपातही क्लिनचिट मिळाली आहे. मात्र,ज्या झोटींग आयोगाच्या अहवालाच्या आधारे खडसे मंत्रिमंडळात पुनरागमन करण्यास उत्सूक होते त्या झोटींग आयोगाच्या अहवालात  आता काहीही अर्थ उरला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.