Mon, May 20, 2019 22:42



होमपेज › Vidarbha › केजरीवालांच्या सभेला परवानगी नाकारली

केजरीवालांच्या सभेला परवानगी नाकारली

Published On: Jan 07 2018 6:59PM | Last Updated: Jan 07 2018 6:59PM

बुकमार्क करा




नागपूर : प्रतिनिधी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे येणार होते. या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होऊन याच सभेतून ते महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ‘आप’चा बिगुल फुंकणार होते.

मात्र, पोलिस प्रशासनाने त्यांच्या सभेस परवानगी नाकारल्याने आता अरविंद केजरीवाल यांच्या दौर्‍याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. अरविंद केजरीवाल 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येणार होते.

दरम्यान, शुक्रवारी (12 जानेवारी) मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि नुकतीच भीमा कोरेगाव येथे घडलेली घटना यामुळे पोलिसांसमोर सुरक्षिततेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळेच सभेला परवानगी नाकारल्याचे बोलले जात आहे.