Mon, Aug 19, 2019 05:09होमपेज › Vidarbha › भाजपने नुसतीच आश्‍वासने दिली : आशिष देशमुख

भाजपने नुसतीच आश्‍वासने दिली : आशिष देशमुख

Published On: Jan 07 2018 6:44PM | Last Updated: Jan 07 2018 7:03PM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यावर साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे. अशा राज्यासोबत राहून विदर्भ विकासाची कल्पना चुकीची आहे. भारतीय जनता पक्षाने जनतेला प्रलोभनकारी आश्‍वासने दिली. मात्र, साडेतीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर शेतकरी आत्महत्या वाढत असून, युवक बेरोजगारी गंभीर समस्या बनली आहे. या दाहक वास्तविकतेची माहिती देणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. त्यांनी, पत्राचे उत्तर दिले नाही. मग, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मला मिळालेल्या नोटिसीचे उत्तर मी दिले नाही, अशी माहिती आमदार आशिष देशमुख यांनी दिली

शेतकरी आत्महत्या वाढतच असून बेरोजगार युवकांची समस्या गंभीर होत चालली आहे. असेच चालत राहिले, तर शेतकर्‍यांप्रमाणेच बेरोजगार युवकांच्या आत्महत्या बघायला मिळतील, असे बोलल्यास अतिशयोक्ती होणार नाही. नागपूरचा विकास म्हणजे अख्ख्या विदर्भाचा विकास नव्हे. नागपूरमध्ये कुठलाच नवीन उद्योग, रोजगार देऊ शकला नाही. भाजप सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत औद्योगिकरणाची सुरुवात व्हायला हवी होती. ती झाली नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकर्‍यांच्या हिताच्या आहेत. त्यावर विचार झाला नाही. येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. यातून शेतकरी हिताचे निर्णय होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

वाचा : मुख्यमंत्र्यांनी पत्राची दखल न घेतल्याने देशमुख अडचणीत