Fri, Jul 19, 2019 01:41होमपेज › Vidarbha › बसमध्ये चढताना आईच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू 

बसमध्ये चढताना आईच्या हातातून पडून बाळाचा मृत्यू 

Published On: Feb 14 2018 7:04PM | Last Updated: Feb 14 2018 7:04PMनागपूर : प्रतिनिधी

बसमध्ये चढत असताना दरवाजा लागल्याने आईच्या हातात असलेला दीड वर्षीय चिमुकला खाली पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल सायंकाळी नागपूरच्या वर्धा रोडवरील विकासनगर चौकात घडली. या प्रकरणी आरोपी बसचालकावर प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उत्कर्ष नागराज गोल्हर असे या चिमुकल्याचे नाव आहे. 

गोल्हर कुटुंबीयांचे नातेवाईक प्रतापनगरातील पांडे ले-आउट येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी नातेवाइकांची भेट घेण्यासाठी उत्कर्षची आई प्रिया त्याला घेऊन नागपूरला आली होती.  आज या मायलेकाला गावी जायचे होते. त्यामुळे काल सायंकाळी उत्कर्षला घेऊन प्रिया स्नेहनगर येथील बसथांब्यावर आली होती. बसची वाटत पाहत ते बसथांब्यावर उभे होते. त्याचवेळी नागपूर-चंद्रपूरमार्गे राजुर्‍याला जाणारी बस आली.

बसचालक उमेश प्रभाकर कुक्शीकांत याने प्रवासी घेण्यासाठी बस थांब्याकडे वळविली. तोच बसच्या दाराचा धक्का उत्कर्षला लागून तो खाली पडला. लगेच त्याला जवळच असलेल्या ढोबळे हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून बसचालक उमेश कुक्शीकांत यास ताब्यात घेतले.