Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Vidarbha › अधिवेशन : दूध दर प्रश्नी विरोधकांचा सभात्याग

अधिवेशन : दूध दर प्रश्नी विरोधकांचा सभात्याग

Published On: Jul 16 2018 12:50PM | Last Updated: Jul 16 2018 3:37PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

दूधाला वाढीव दर मिळावा व लिटरमागे अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. या प्रश्नावर विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. मात्र सरकारने लिटरमागे अनुदान देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने विरोधकांनी सभात्याग केला.