Tue, Nov 13, 2018 23:28



होमपेज › Vidarbha › शहीद मेजर प्रफुल्लच्या आईने केले सर्जिकल स्ट्राईकचे स्वागत

शहीद मेजर प्रफुल्लच्या आईने केले सर्जिकल स्ट्राईकचे स्वागत

Published On: Dec 26 2017 9:22PM | Last Updated: Dec 26 2017 9:22PM

बुकमार्क करा





नागपूर : प्रतिनिधी

भारतीय सेनेने एलओसी सिमा पार करून केलेल्या पाकिस्तानातील सर्जिकल स्ट्राईकवर भंडार्‍याचे मेजर प्रफुल मोहरकर यांच्या आईने आज आपली प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानला धडा शिकविल्याने शहीद प्रफुल मोहरकरच्या आईने योग्य निर्णय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्कराचे एक मेजर आणि 3 जवान शहीद झाले होते. त्याचा प्रतिउत्तर देतांना हिंदुस्थानने पाकिस्तानच्या कश्मीर व्याप्त भागात घुसून सर्जिकल स्ट्राईक करीत 3 पाकिस्तानच्या जवानांना कंठस्थान घातले. या विषयी शहीद जवान मेजर प्रफुल मोहरकर यांच्या आईला विचारले असता त्यांनी सांगितले कि आर्मी जे निर्णय घेत आहे ते योग्यच आहे. आज जे झाले ते योग्य आहे, कारण त्यांनाही थोडं सह बसायलाच हवा आणि इंडियन आर्मीने जो प्रतिउत्तर दिले त्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, जरी माझा मुलगा शहिद झाला असला तरी सर्व आर्मीच माझे मुले आहेत, त्यांचे प्रत्येक निर्णयांचा स्वागतच आहे. भारतीय सेनेने पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्टाईल ने पाकिस्तानी सैन्याचा खात्मा केल्याने त्यांना देखील धडा मिळाला असल्याने गावकर्‍यांनी देखील भारतीय सेनेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.