Tue, Jul 23, 2019 17:06होमपेज › Vidarbha › पोलिसांचा खबरी; नक्षलवाद्यांनी केली एकाची हत्या

‘…म्हणून आम्ही त्याला मृत्यूची शिक्षा देत आहोत’

Published On: May 05 2018 1:34PM | Last Updated: May 05 2018 1:33PMगडचिरोली : पुढारी ऑनलाईन 

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी पांडुरंग पदा यांची गोळ्या झाडून हत्या केली. पांडुरंग हा धानोरा तालुक्यातील होरेकसा येथील रहिवासी आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 पथकाने मोठी कारवाई करत गडचिरोलीच्या जंगल भागातील 37 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवायानंतर गडचिरोली भागात तणावांचे वातावरण आहे. असे असताना नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या या हत्येमुळे पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी 

पांडूरंग पाद हा पोलिसांचा खबरी असल्याने त्याला मृत्यूची शिक्षा देण्यात येत आहे. अशी चिठ्ठी माओवाद्यांनी लिहून ठेवली होती. 

‘८ मे २०१५ साली होरेकस्सा गावामध्ये झालेल्या घटनेत जनतेची प्रिय नेती कॉम्रेड रजिना शहिद झाली आहे. होरेकस्सा गावात झालेल्या घटनेच्या मागे मुखाबिरी (पोलिसांचा खबरी) पांडूरंग पदा याचा हात असल्याने त्याला मृत्यूची शिक्षा देण्यात येत आहे. भा.क.प. माओवादी (चातगाव एरिया. कमेटी) 

आठवड्यात ४७ नक्षलींना यमसदनी पाठवले

दरम्यान, 22 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत 16 नक्षलवाद्यांना  ठार करण्यात आले होते. यामध्ये आणखी 15 जणांचे मृतदेह इंद्रावती नदीत मंगळवारी सापडले. त्यात 7 पुरुष आणि 8 महिला होत्या. त्याशिवाय सोमवारी (२३ एप्रिल) रात्रीदेखील पोलिसांनी 6 नक्षलवाद्यांचा  खात्मा केला होता. यानंतर २७ एप्रिलला सुरक्षा दलाने छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 10 नक्षलवाद्यांना ठार केले होते. 

Tags : maowadi, naxal, Attack, dead,gadchirol