Fri, Jun 05, 2020 18:44होमपेज › Vidarbha › मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच : नितीन गडकरी 

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच : नितीन गडकरी 

Last Updated: Nov 15 2019 1:32AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीनागपूर : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने दावा सांगितला असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्राच्या जनतेने भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीला जनादेश दिला आहे. भाजपचे १०५ आमदार निवडून आले आहेत. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री होतो. यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे गडकरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. 

आम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेऊ. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. राज्यात युतीचेच सरकार बनेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

राज्यातील सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचा काही संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन तिढा निर्माण झाला आहे. यावर बोलताना गडकरी यांनी, आपण महाराष्ट्रात येण्याचा प्रश्न नाही. मी दिल्लीतच काम करणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनीही, राज्यात महायुतीचे सरकार बनेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी पावले उचलणार आहोत. राज्यात भाजप- शिवसेनेचे सरकार व्हावं हा प्रयत्न आहे. कोंडी फुटावी, चर्चा व्हावी हीच आमची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत शिवसैनिक समजतात. त्यामुळे महायुतीचे सरकार बनेल, असे त्यांनी नमूद केले आहे.