Mon, Jul 22, 2019 02:38होमपेज › Vidarbha › स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘या’ गावात पोहोचली वीज 

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात पोहोचली वीज 

Published On: Apr 15 2018 12:52PM | Last Updated: Apr 15 2018 12:52PMअमरावती : पुढारी ऑनलाईन 

विज्ञान-तंत्रज्ञानात भारताने चंद्र आणि मंगळापर्यंत झेप घेतली आहे. अशा देशात एखाद्या गावात वीज पोहोचवणे ही बाब अगदी किरकोळ म्हणावी लागेल. पण देशात एखाद्या गावात वीज पोहोचवण्यासाठी ७० वर्ष लागतील असे म्हटले तर कोणालाही धक्का बसेल. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच वीज देखील जीवनावश्यक गोष्ट आहे. पण वीजेचा प्रकाश मिळण्यासाठी महाराष्ट्रातील एका गावाला  तब्बल 71 वर्षे वाट पहावी लागली. 

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील बुलुमगव्हाण  (तालुका : धारणी) या गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर वीज पोहोचली आहे. 

बुलुमगव्हाण या गावाची लोकसंख्या ५०० इतकी आहे. गावापासून सर्वात जवळचे शहर ११२ किलोमीटर लांब आहे. त्यामुळे कोणत्याही सुविधेसाठी इतक्या लांब जावे लागते. देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला विनामूल्य वीजजोडणी देण्याच्या 'सौभाग्य' योजने अंतर्गत या गावाला वीजपुरवठा करण्यात आला. या छोट्याश्या गावातील १०५ घरे उजळून निघाली आहेत. 

गावात वीज नसल्याने अनेक अचडणींना सामोरे जावे लागत होते. गावातील विद्यार्थ्यांना रात्री दिव्याच्या अंधारातच अभ्यास करावा लागत होता. आता  गावात वीज आल्याने सर्वत्रच आनंदाचे वातावरण आहे, असे गावातील एका ग्रामस्थाने सांगितले. 

भारत सरकार आणि गावकऱ्यांच्या एकत्र प्रयत्न आणि मेहनतीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. गावाचा विकास झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद आणि उल्हासाचे वातावरण आहे. 
 

Tags : Maharashtra, Tribal, Village, Electicity, Independence, bulumgavhan