Fri, Dec 13, 2019 18:07



होमपेज › Vidarbha › पीएम मोदींमुळेच जगाने योग स्‍वीकारला : मुख्यमंत्री(व्हिडिओ)

पीएम मोदींमुळेच जगाने योग स्‍वीकारला : मुख्यमंत्री(व्हिडिओ)

Published On: Jun 21 2019 9:13AM | Last Updated: Jun 21 2019 9:13AM




नांदेड : पुढारी ऑनलाईन

संपूर्ण जगभरात आज आंतरराष्‍ट्रीय योग दिवसाच्या निमित्‍ताने योगा केला जात आहे. याच दिवसाचे औचित्‍य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगगुरू बाबा रामदेव यांच्यासोबत नांदेडमध्ये योगासने केली. यावेळी फडणवीस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच सगळ्या जगाने योग स्वीकारला आणि याचा मला फार अभिमान आहे, असे मत व्यक्‍त केले. 

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्‍हणाले, ‘‘योगाची परंपरा जगभरात पोहचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. आपल्या देशाची प्राचीन परंपरा सगळ्या जगाने स्वीकारली ही अभिमानास्पद बाब आहे. रामदेवबाबांनीही भारतात योग पोहचविण्याचे काम केले.’’

या वेळी बोलताना बाबारामदेव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोतुक केले. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग पोहोचवला याबाबत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. योग हा आपल्या आयुष्यात मोलाचा वाटा उचलणारा भाग आहे, आपल्याला योग निरोगी ठेवण्यास मदत करतो, असे मत बाबारामदेव यांनी व्यक्‍त केले.

दरम्‍यान आज, रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी मोदीं ६५ मिनिटे योगा केला.