Mon, Aug 26, 2019 01:30होमपेज › Vidarbha › नागपूरमध्ये पत्रकाराच्या आई, मुलीची हत्‍या 

नागपूरमध्ये पत्रकाराच्या आई, मुलीची हत्‍या 

Published On: Feb 18 2018 1:37PM | Last Updated: Feb 18 2018 1:37PMनागपूर : पुढारी ऑनलाईन

नागपूर येथील पत्रकार रविकांत कांबळे यांची आई व मुलगी शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. त्यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी नागपूरमधील दिघोरी नाक्‍याजवळ कांबळे यांच्या आईचा व मुलीचा मृतदेह सापडल्याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली. 

मुख्यमंत्र्यांच्या नागपूर पत्रकाराच्या आई व मुलीची हत्या झाल्याची घटना घडल्याने कायदा सुव्यवस्‍थेचा प्रश्न उपस्‍थित झाला आहे. रविकांत कांबळे हे नागपूर टुडेचे पत्रकार आहेत. या घटनेमुळे शहरातून तीव्र संताप व्‍यक्‍त करण्यात येत आहे.