Sat, Jul 04, 2020 15:10होमपेज › Vidarbha › अमरावतीच्या नवीन भागात कोरोनाचा शिरकाव

अमरावतीच्या नवीन भागात कोरोनाचा शिरकाव

Last Updated: Jun 03 2020 9:49AM

संग्रहित छायाचित्रनागपूर  : पुढारी वृत्तसेवा

अमरावतीत कोरोना रूग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून बुधवारी सलग आठव्या दिवशी कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत ४ ने वाढ झाली. मसानगंज, रतनगंज, हैदरपुरा, हबीब नगर, पठाणपुरानंतर आता  शहराच्या नवीन भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर चिंता आणखी वाढली आहे.

अमरावतीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक; नवे १८ जण पॉझिटिव्ह

शहराच्या मध्यवस्तीत रुक्मिणीनगर, यशोदा नगर, वडरपुरा, जलाराम नगर या परिसरात बुधवारी नविन रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे हा नविन भाग प्रतिबंधित करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. मंगळवारी कोरोनाचे १९ नवीन रूग्ण आढळले होते. विशेष म्हणजे त्यात चार बालकांचा समावेश आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५३ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून प्रत्येक्षात ८९ रुग्णच कोरोना क्रियाशील आहे व त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

तीन रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले आहे. १५ जणांचा मृत्यू झाला असून १४६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी बुधवारी (दि ३ जून) सकाळी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीत आज आणखी चार पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. यात यशोदानगर येथील २३ वर्षीय महिला, वडारपूरा येथील २५ वर्षीय युवक,  रुक्मिणीनगर येथील २२ वर्षीय महिला आणि मसान गंज येथील ४१ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. या ४ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू कण्यात आली आहे.

'आधार' प्रणालीने शोधले मुकबधीर महिलेचे घर

२२ रुग्णांना मिळाली सुटी

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २२ रुग्णांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १४६ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहे. कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असली तरी बरे होणार्‍यांचे प्रमाणही समाधानकारक आहे.