Thu, Apr 25, 2019 21:29होमपेज › Vidarbha › उद्या उद्धव ठाकरे यांचे पाय धरेन : जानकर

उद्या उद्धव ठाकरे यांचे पाय धरेन : जानकर

Published On: Jul 07 2018 1:38AM | Last Updated: Jul 07 2018 1:38AMनागपूर : प्रतिनिधी

राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे विधानभवनपरिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरत असतानाचा एक फोटो गुरुवारी व्हायरल झाला होता. या फोटोमुळे विरोधकांनी जानकरांना टीकेचे लक्ष केले होते. यावर प्रतिक्रिया देताना जानकर यांनी पाय पकडणे ही आपली संस्कृती असल्याचे सांगत विरोधकांना उत्तर दिले. उद्या मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पायही धरेप असे जानकरांनी स्पष्ट केले.

महादेव जानकर हे रावसाहेब दानवे यांच्या पाया पडत असल्याच्या फोटोमुळे विरोधकांनी जानकरांचा चांगलाच खरपूस समाचार घेला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्‍हणाले की, ‘‘जानकर, आता आणखी किती लाचारी करणार, सत्ताधारी भाजपसोबत आघाडीत आहेज. आपला पक्ष असतानाही जानकर यांना दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षांचा पाया पडावे का लागत आहे? 

यावर प्रतिक्रिया देताना जानकर म्हणाले, ‘‘मी नेहमीच रावसाहेब दानवे, नितीन गडकरी यांचे पाय धरतो. गोपिनाथ मुंडे यांचेही पाय धरायचो. ही आपली संस्कृती असल्याचे जानकर त्यांनी अधोरेतिख केले. राज्यात शिवसेना भाजप युती टिकायला हवी. रासप यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ही युती टिकावी यासाठी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही पाय धरेन. असे वक्‍तव्य जानकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले.