Sun, Jul 21, 2019 00:02होमपेज › Vidarbha › ‘या’ हट्टामुळे श्वेता झाली स्वच्छता दूत

‘या’ हट्टामुळे श्वेता झाली स्वच्छता दूत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

यवतमाळ: पुढारी ऑनलाइन

घरात शौचालय नसल्यामुळे पत्नी माहेरी गेल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण एका दहा वर्षाच्या मुलीने शौचालन नसल्यामुळे एक हट्ट केला आणि तो पूर्ण करून घेण्यात तिला यश देखील आले. चौथीत शिकणाऱ्या मुलीने जोपर्यंत शौचालय बांधणार नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही असा हट्ट धरला. यानंतर जे काही झाले त्यामुळे ही मुलगी जिल्ह्यातील स्वच्छता अभियानाची ब्रॅण्ड अॅम्बेसॅडर  झाली. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या श्वेता रंगारीला स्वच्छता अभियानासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये हात स्वच्छ धुवणे, पाणी उकळून पिणे आणि शौचालयात जाणे आदींचा समावेश होता. श्वेताने शौचालया संदर्भातील प्रश्नाच्या खालची जागा रिकामी सोडली होती. याबाबत शिक्षकांनी विचारला असता. श्वेताने घरी शौचालय नसल्याचे सांगितले. 

या घटनेनंतर श्वेता तीन दिवस शाळेला आली नाही.  शिक्षकांनी जेव्हा श्वेताच्या शाळेत न येण्याचे कारण जाणून घेतले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. दहा वर्षाच्या श्वेताने घरी जाऊन वडीलांकडे जोपर्यंत घरी शौचालय बांधणार नाही तोपर्यंत शाळेला जाणार नाही असा हट्ट धरला. श्वेताने हा हट्ट सोडावा यासाठी केवळ घरातल्यांनीच नव्हे तर शिक्षकांनी देखील तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वेता काही केल्या हट्ट सोडण्यास तयार नव्हती. अखेर वडीलांना तिचा हट्ट पूर्ण करावा लागला. 

श्वेताचा हट्ट पूर्ण करण्यासाठी वडीलांनी 10 हजार रुपयांचे कर्ज काढले. मुलीच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून कर्ज काढून आपण एक आदर्श वडील असल्याचे दाखवून दिले.