Thu, Feb 21, 2019 04:58होमपेज › Vidarbha › राहुल पंतप्रधान होण्यात गैर काय? : उद्धव ठाकरे

राहुल पंतप्रधान होण्यात गैर काय? : उद्धव ठाकरे

Published On: May 12 2018 8:18AM | Last Updated: May 12 2018 8:18AMनागपूर : प्रतिनिधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान होण्यात गैर काय, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्यास तयार असल्याचे वक्‍तव्य दिल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. यासंदर्भात ते म्हणाले, देशाच्या प्रत्येकाला पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे. यात एवढा गहजब करण्यात काय हशील आहे. देशाची जनता ठरवतील, कोण पंतप्रधान होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत सेनेचा उमेदवार राहील किंवा नाही, यासंदर्भात येत्या 1-2 दिवसांत स्पष्ट केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावरच लढणार, या निर्धाराचा उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. हा निर्णय माझा नसून शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा असल्याने आता त्यातून माघार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले.

Tags : shivsena, nagapur, vidarbh, rahul gandhi, uddhav thackeray, palghar