Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Vidarbha › शहरात तब्बल २७२.७ मिमी पावसाची नोंद 

नागपूर : पावसाचा १०७ वर्ष जुना रेकॉर्ड तुटणार?

Published On: Jul 08 2018 1:46AM | Last Updated: Jul 08 2018 1:46AMनागपूर : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पावसाळी अधिवेशनातच उपराजधानीत धुमाकूळ घातला. काल,शुक्रवारी १२ तासांत तब्बल २७२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज, शनिवारीही पावसाचा जोर कायम असल्याने नागपूरच्या इतिहासातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.  

१२ जून १९११ ला नागपुरात २४ तासांत तब्बल ३१५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे हा आकडा ओलांडल्यास यंदाचा हा पाऊस १०७ वर्षाचा  रेकॉर्ड तोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकेच नाही तर या नागपुरातील सर्वाधिक पाऊस शुक्रवारी १२ तासांतच झाल्याची आकडेवारी हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. 

काल, शुक्रवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्री अडीच ते सकाळी साडेआठ या दरम्यान ६२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर सकाळी १० वाजेपर्यत शहरात पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या सहा तासांतच शहरात तब्बल २६३.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. शुक्रवारी सकाळी 8.30 ते रात्री संध्याकाळी 8.30 या 12 तासांत शहरात 272.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे यंदाचा हा पाऊस १०७ वर्षाचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. २००६च्या तुलनेत शुक्रवारी झालेला पाऊस अधिक आहे.