Sun, Jun 16, 2019 12:53
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › भंडारा : आचारसंहितेत निधी वाटप; भाजप अडचणीत(Video)

भंडारा : निधी वाटप; भाजप अडचणीत(Video)

Published On: May 26 2018 9:43AM | Last Updated: May 26 2018 9:43AMभंडारा : पुढारी ऑनलाईन

येत्या सोमवारी भंडारा गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान आचरसंहितेच्या काळात नुकसान भरपाईचे पैसे देण्याचा सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. जिल्ह्यात डिसेंबर मध्ये तुडतुडे किडीचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना प्रभावित करण्यासाठी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगतिले. 

भंडारा-गोंदिया येथे आचारसंहिता जारी असताना जिल्हा ट्रेझररीमध्ये नुकसानभरपाईचे पैसे जमा करण्यात आले. आचारसंहितेचा भंग करत मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून  याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल करण्यात आला. शेतकऱ्यांनी मागितल्यानंतरही पैसे मिळाले नव्हते. मात्र, मतदान जवळ येताच १०.५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्याचा घाट सरकारकडून घालण्यात आला. याचे स्टिंग ऑपरेशन राष्ट्रवादीने केले.

याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे १० मे ला आले होते. मात्र निवडणुक कामामुळे पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी उशिर झाला. ते पैसे लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासन काम करत होते. पण आता हे काम थांबवण्यात आले असून निवहणुक झाल्यानंतर पैसे शेतकऱ्यांना दिले जातील.

No automatic alt text available.